कोलंबो (श्रीलंका) – दिवाळखोरीच्या वाटेवर असलेल्या श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू असतांनाच पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी त्यागपत्र दिले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून विरोधी पक्षांकडून त्यांचे त्यागपत्र मागण्यात येत होते. त्यागपत्र देण्यापूर्वी राजपक्षे म्हणाले की, जनतेसाठी मी कोणतेही बलीदान देण्यासाठी सिद्ध आहे.
#BREAKING | Sri Lankan PM Mahinda Rajapaksa resigns.
Srinjoy Chowdhury & Shilpa join @poonam_burde with the latest updates.#SriLanka #MahindaRajapaksa pic.twitter.com/0UnAvmnSuq
— TIMES NOW (@TimesNow) May 9, 2022
श्रीलंकेमध्ये सर्वपक्षियांचे अंतरिम सरकार बनवण्याची मागणी केली जात होती. त्याला आधी नकार देण्यात येत होता; मात्र आता राजपक्षे यांच्या त्यागपत्रानंतर अशा प्रकारचे सरकार बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.