१. आपत्तींमुळे घरांची पडझड, कुटुंबाची वाताहात आणि खाण्या-पिण्याची चणचण निर्माण होणे
२. इंधनाचा (पेट्रोल, डिझेल आदींचा) तुटवडा निर्माण झाल्याने दळणवळण ठप्प होणे
३. उद्योगधंदे बंद पडल्याने प्रचंड आर्थिक मंदी येणे
४. साथीचे रोग पसरणे, तसेच डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये इत्यादी सहजपणे उपलब्ध न होणे
५. दूरभाष, भ्रमणभाष, इंटरनेट, तसेच विजेवर चालणाऱ्या सर्व यंत्रणा आणि व्यवस्थाही खंडित होणे
६. विमानतळ, रेल्वेमार्ग, महामार्ग आदी वाहतूक-व्यवस्था कोलमडून शासनयंत्रणेच्या साहाय्यकार्यातही अडथळे येणे आणि जीवनावश्यक वस्तूंसाठीही जीवघेणा संघर्ष करावा लागणे
७. आपत्काळाच्या या भीषणतेमुळे अनेक जण मानसिक रुग्ण होणे आणि काही जणांना ‘जगण्यापेक्षा मरण बरे’, असे वाटणे
(भीषण आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता कशी करावी ?, याविषयी सविस्तर विवेचन सनातनच्या ‘आपत्काळातील जीवितरक्षण ग्रंथमालिका (२ खंड)’ यात केले आहे.)