अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे प्रकरण
गगनबावडा (जिल्हा कोल्हापूर) – १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अल्लाबक्ष मुल्ला याला १७ मार्चला अटक केली आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र आघाडीवर ! – संपादक) या प्रकरणात कोणत्याही प्रकारची तडतोड अथवा मिटवामिटवी न होता गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने गगनबावडा पोलीस ठाण्यात देण्यात आले. (असे निवेदन का द्यावे लागते ? – संपादक) या प्रकरणात पोलीस प्रशासनाने अधिक अन्वेषण करून संशयितास कठोर शिक्षा होण्यासाठी सर्व आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रसंगी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.