‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
शक्ती, चैतन्य आणि सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणारी संस्कृत भाषा शिका ! – संपादक

कर्नाटकात उभारण्यात येणार्या संस्कृत विश्वविद्यालयाला काँग्रेसवाले ‘बेकार’ असे म्हणतात. पंडित नेहरू यांनी संस्कृत भाषेला ‘मृत’ ठरवले होते. प्रत्यक्षात देववाणी असणार्या संस्कृत भाषेविषयी केलेले संशोधन आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

‘वन्दे मातरम्’ हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा अविभाज्य घटक झाले होते; किंबहुना ‘वन्दे मातरम्’विना भारतीय स्वातंत्र्यलढा हा अपूर्णच म्हणावा लागेल. ‘वन्दे मातरम् !’ या दोन शब्दांनी सहस्रो क्रांतीकारकांना प्रेरित केले. इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याचा तो एक मूलमंत्रच झाला ! ‘वन्दे मातरम्’ हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतका प्रेरक मंत्र होता की, मादाम कामा यांनी ‘वन्दे मातरम्’ या शब्दांना भारताच्या नियोजित राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी ठळकपणे स्थान दिले आणि तो राष्ट्रध्वज १९०७ मध्ये बर्लिन येथे फडकावला. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत आजही, म्हणजे ते रचल्यानंतर १५० वर्षांनीही राष्ट्राभिमान्यांमध्ये जाज्वल्य राष्ट्रभक्ती, तसेच भारतभूमीविषयी असामान्य प्रेम निर्माण करण्यात सिंहाची भूमिका निभावते.
संस्कृत भाषेतील ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ११.८.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
____________________________
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत २ साधिका सहभागी झाल्या होत्या. चाचणीतील पहिल्या साधिकेला आध्यात्मिक त्रास (टीप) आहे, तर दुसर्या साधिकेला आध्यात्मिक त्रास नाही. दोन्ही साधिकांनी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणण्यापूर्वी आणि म्हटल्यानंतर त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्याचा साधिकांवर झालेला परिणाम पुढे दिला आहे.
१ अ. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्याचा साधिकांवर सकारात्मक परिणाम होणे : ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर दोन्ही साधिकांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली किंवा तिच्यामध्ये वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून स्पष्ट होते.


संस्कृत भाषेतील ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत सनातन चैतन्यवाणी या ॲपवर उपलब्ध आहे. हे ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –
https://www.sanatan.org/Chaitanyavani

२. निष्कर्ष
‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्याचा दोन्ही साधिकांवर सकारात्मक परिणाम झाला.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेली साधिका यांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होणे अन् त्यामागील कारणमीमांसा
३ अ १. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत संस्कृत भाषेमध्ये असल्याने, तसेच त्यात मातृभूमीला वंदन आणि तिची स्तुती असल्याने या गीतामध्ये शक्ती अन् चैतन्य असणे : संस्कृत ही विश्वातील सर्वाधिक सात्त्विक भाषा आहे. सात्त्विक भाषेतून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. राष्ट्रभक्त बंकीमचंद्र चट्टोपाध्याय रचित ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत संस्कृत भाषेमध्ये असल्याने, तसेच त्यात मातृभूमीला वंदन आणि तिची स्तुती असल्याने त्यात शक्ती आणि चैतन्य आहे. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणतांना मातृभूमीविषयी प्रेम आणि आदर निर्माण होतो. त्यामुळे गाणार्यामध्ये राष्ट्राविषयीची अस्मिता वाढून राष्ट्रनिष्ठा प्रबळ होते.
चाचणीतील साधिकांनी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यामुळे त्यांना गीतातील शक्ती आणि चैतन्य याचा लाभ झाला. त्यामुळे दोन्ही साधिकांना ‘त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे, त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे किंवा तिच्यामध्ये वाढ होणे’, असे आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले.
‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतो’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.५.२०१९)
ई-मेल : [email protected]
| टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
व्यक्तीच्या जाणिवेचे विविध स्तर आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
नियमित साधनेने मनाची शुद्धी, योग्य निर्णयक्षमता आणि अंतर्मनातील स्पष्टता वाढते ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
व्यक्तीच्या जाणिवेचे विविध स्तर आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !