आगरा (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीमध्ये ध्वजारोहण करण्याला ‘हराम’ (निंदनीय) म्हणणार्‍या मुफ्तीच्या विरोधात गुन्हा नोंद !

अशा धर्मांध देशद्रोह्यांना तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात डांबले पाहिजे, तरच इतरांना वचक बसेल !

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील शाही जामा मशिदीच्या आतमध्ये १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण आणि राष्ट्रगीताचे गायन यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधाने केल्याच्या प्रकरणी पोलिसांत शहराचे मुफ्ती (शरियत कायद्याचे जाणकार, विद्वान) मजदुल खूबैब रूमी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अखिल भारत हिंदु महासभा आणि राष्ट्रीय हिंदू परिषद भारत या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली.

रूमी यांच्या विधानांची ध्वनीफीत प्रसारित झाली आहे. त्यातून ही माहिती समोर आली. या ध्वनीफितीमध्ये रूमी यांनी ‘भारतात राहून राष्ट्रध्वज फडकावणे, राष्ट्रगीत गाणे आणि भारत माता की जय बोलणे ‘हराम’ (निंदनीय) आहे’, असे म्हणत असल्याचे समोर आले आहे.