‘यू ट्यूब’कडूनही तालिबानच्या खात्यांवर बंदी

तालिबान मुळात एक आतंकवादी संघटना असतांना यापूर्वीच ‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब’ यांनी त्यांच्या खात्यांवर बंदी घातली नाही किंवा त्यांना खातेच उघडता येऊ नये, यासाठी प्रयत्न का केले नाहीत ? आता अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यावर बंदी घालणे म्हणजे वराती मागून घोडे नाचवण्यासारखेच आहे !

नवी देहली – फेसबूकनंतर आता ‘यू ट्यूब’नेही तालिबानच्या खात्यांवर बंदी घातली आहे. (‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब’ यांवर आणखी किती जिहादी आतंकवादी संघटना आणि जिहादी नेते यांची खाती आहेत, हे त्यांनी घोषित करून जगाला माहिती दिली पाहिजे. जर अशी खाती असतील, तर त्यांनी आतापर्यंत त्यांच्यावर बंदी का घातली नाही, हेही सांगायला हवे ! – संपादक) ‘तालिबानला प्रोत्साहन देणारी माहिती फेसबूकवरून काढणार’, असे फेसबूकने म्हटले आहे.