जुगाराचा खेळ असणारे ‘रमी गणेश प्रो’ अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरने हटवले !

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू यांच्या विरोधाचा परिणाम !

हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी संघटित होऊन देवतांच्या अवमानाचा विरोध केल्यास त्याला ईश्‍वराच्या कृपेने यश मिळते, हेच यातून स्पष्ट होते ! – संपादक

मुंबई – जुगाराचा खेळ असणारे ‘रमी गणेश प्रो’ हे ‘अ‍ॅप’ हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू यांनी केलेल्या विरोधानंतर ‘गूगल प्ले स्टोअर’वरून हटवण्यात आला आहे. या ‘अ‍ॅप’ला हिंदूंचे दैवत श्री गणेशाचे नाव दिल्याने याला विरोध करण्यात आला होता. हिंदूंनी याविषयी हिंदु जनजागृती समितीला कळवल्यावर समितीने वैध मार्गाने याचा विरोध केला हाता. तसेच ट्वीट करून गूगलकडे हे अ‍ॅप हटवण्याची मागणी केली होती. हिंदुत्वनिष्ठांनी या अ‍ॅपच्या विरोधात #BanRummyGaneshProApp या नावाने ट्विटर ट्रेंडही केला होता. यानंतर हे अ‍ॅप हटवण्यात आल्याचे दिसून आले आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक