केरळ येथील सायरो मलबार चर्चने ५ अथवा त्याहून अधिक अपत्ये असलेल्या ख्रिस्ती दांपत्यांना दिल्या आर्थिक सुविधा !

  • पाच किंवा त्याहून अधिक अपत्ये असलेल्या ख्रिस्ती दांपत्याला प्रतिमास मिळणार १ सहस्र ५०० रुपये !

  • ख्रिस्ती महिलेच्या चौथ्या अथवा त्यानंतरच्या प्रसूतीचा सर्व खर्च चर्च करणार !

  • ‘लोकसंख्या नियंत्रण कायद्या’ची आज देशाला नितांत आवश्यकता असतांना चर्चने दिलेली ही सुविधा म्हणजे राष्ट्रघात आहे, हे लक्षात घ्या !
  • लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर योगी आदित्यनाथ अथवा अन्य कुणी हिंदुत्वनिष्ठ नेता यांनी वक्तव्य केल्यावर आकाशपाताळ एक करणारा धर्मनिरपेक्षतावादी चमू आता मात्र गप्प आहे. यातून अशांची दुटप्पी मानसिकता लक्षात येते !
  • आज भारतात ८ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. त्यामुळे या राज्यांत कुणी हिंदूंनी अनेक मुलांना जन्म घालण्याची घोषणा केली, तर त्यात चूक ते काय ?
सायरो मलबार चर्च

थिरूवनंथपूरम् – येथील सायरो मलबार चर्चने ५ अथवा त्याहून अधिक अपत्ये असलेल्या ख्रिस्ती दांपत्यांना प्रतिमास १ सहस्र ५०० रुपये आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली आहे. चर्चचे या संबंधीचे एक भित्तीपत्रक समोर आले असून त्यामध्ये चौथ्या अपत्यापासून पुढील सर्व अपत्यांना शिष्यवृत्ती देण्याचे सांगण्यात आले आहे.

चर्चसंचालित ‘सेंट जोसेफ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नोलॉजी’कडून ही शिष्यवृत्ती देण्यात येणार असून चर्चसंचालित रुग्णालयाकडून विनामूल्य चिकित्सा सुविधाही देण्यात येणार आहे, अशी माहिती या पत्रकातून समोर आली आहे. यासमवेतच ख्रिस्ती महिला पाचव्यांदा अथवा त्याहून अधिक वेळा गरोदर राहिल्यास प्रत्येक वेळी तिच्या प्रसूतीचा सर्व व्यय चर्च उचलणार आहे. या योजनेचा पहिला टप्पा म्हणून केरळमधील मीनाचिल आणि कोट्टायम् या भागांसाठी कार्यान्वित करण्यात आल्याचे समोर आले आहे.

ख्रिस्ती दांपत्यांना प्रतिमास १ सहस्र ५०० रुपये शिष्यवृत्ती

सायरो मलबार चर्चचे बिशप जोसेफ कुट्टियांकल यांनी ही योजना जाहीर केली असून ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या न्यून होत असल्यामुळे अशा प्रकारे सुविधा घोषित करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.