देवळातील चैतन्य टिकवण्याचे देवस्थान समितीचे दायित्व !

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. देवस्थान समितीचे कार्य देवत्व जपणे

देवस्थान समितीचे कार्य केवळ उत्सवात मिळणारा देवळातील पैसा गोळा करून त्याचा हिशोब ठेवणे, हे नाही किंवा केवळ देवळाला सोन्याचा कळस करून त्याचे उद्घाटन एखाद्या मंत्र्याच्या हस्ते किंवा आमदाराच्या हस्ते करणे, हे नाही, तर देवाच्या मूर्तीतील सोन्यासारखे असणारे तेजाधिष्ठित देवत्व जपणे, हा आहे, तरच देवस्थान समितीवर देवतेची कृपा होईल. अन्यथा देवस्थान समितीला भाविकांचा विश्वास गमवावा लागल्याने परिणामी देवतेची कृपाही त्यांच्यावर होणार नाही.

२. एखाद्या संतांच्या आश्रयाने देवळाचा कारभार पाहिला पाहिजे !

देवस्थान समितीने आपल्या कार्याची उद्दिष्टे काय आहेत, हे समजून घेऊन एखाद्या संतांच्या आश्रयाने देवळाचा कारभार पाहिला, तरच खर्‍या अर्थाने देऊळ पवित्र संस्कारांनी भारीत राहील आणि तेथील चैतन्य अनेक वर्षे भाविकांना त्याच्यातील जागृततेची अनुभूती देणारे ठरेल.

३. एका देवळाच्या सात्त्विकतेमुळे सहस्रो किलोमीटरचा परिसर शुद्ध होण्यास साहाय्य मिळणे

अशा पद्धतीने देवळाला एका चैतन्यरूपी धर्मसंस्थानाच्या रूपात जिवापाड जपले, तरच आपल्या सर्वांची आध्यात्मिक उन्नती होऊन देवाचा वरदहस्त आपल्या डोक्यावर राहील !, तसेच एका देवळाच्या सात्त्विकतेमुळे सहस्रो किलोमीटरचा परिसर शुद्ध होण्यास साहाय्य होईल.

चला, तर देऊळ सात्त्विक करण्यासाठी झटूया आणि त्यासाठी देवळात ठिकठिकाणी समष्टी साधना म्हणून धर्मशिक्षणाचे अभियान राबवून तेथील भ्रष्टाचाराला आळा घालून देवतेची कृपा संपादन करूया !

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.