काश्मीरमध्ये गेल्या २४ घंट्यांत ५ आतंकवादी ठार

काश्मीरमध्ये सातत्याने जिहादी आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील आतंकवाद नष्ट होत नाही; कारण आतंकवाद्यांची निर्मिती पाकमध्ये चालूच आहे. ती थांबवण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – कुलगाम आणि पुलवामा येथे ८ जुलैला झालेल्या चकमकींमध्ये सुरक्षादलांनी ४ आतंकवाद्यांना ठार केले. त्यापूर्वी ७ जुलैला कुपवाडा येथील गँडर्स भागात हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद याला ठार करण्यात आले होते. गेल्या २४ घंट्यांत एकूण ५ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. कुलगाममध्ये एका आतंकवाद्याला ठार करण्यात आले. तो लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी होता. पुलवामाच्या पुचल भागातील चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले.