पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन का नाही ?

  • अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या पर्ल पुरी याला जामीन

  • पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या भक्तांचा सामाजिक माध्यमांतून संताप !

नवी देहली – दूरचित्रवाहिन्यांवरील अभिनेता पर्ल पुरी याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. वसई सत्र न्यायालयाने पुरी याला जामीन दिल्यामुळे पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांच्या भक्तांनी याविरोधात सामाजिक माध्यमांतून संताप व्यक्त केला आहे. ‘पर्ल याच्या अटकेनंतर केवळ ११ दिवसांत जामीन कसा मिळाला ?’, असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे.

१. पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांच्या भक्तांचा आरोप आहे की, आसाराम बापूंवरही अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यांनाही पर्लप्रमाणे पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. जर या प्रकरणी पर्लला जामीन संमत होऊ शकतो, तर बापूंना का नाही ? हा पक्षपात आहे.

२. सामाजिक माध्यमांतून एका वापरकर्त्याने ट्वीट करत म्हटले आहे की, अभिनेता पर्ल पुरी याला जामीन मिळतो. जिथे भारताला संतांची भूमी म्हटले जाते, तिथे त्याच पॉक्सो कायद्यांतर्गत आसाराम बापू यांना जामीन मिळत नाही.