रणगाडे आणि क्षेपणास्त्र यांनी सज्ज असलेल्या रशियाने युक्रेनला घेरले

नवी देहली – युक्रेनला रशियाच्या सहस्रो रणगाडे आणि क्षेपणास्त्रे यांद्वारे घेरण्यात आले आहे. यामुळे युरोपमध्ये सध्या सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. रशियाची आक्रमक भूमिका पाहून अमेरिका पुढील आठवड्यात काळ्या समुद्रात तिच्या २ युद्धनौका पाठवण्याची सिद्धता करत आहे.

 (सौजन्य : The Sun)

यामुळे जागतिक महायुद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. रशियाने चेतावणी दिली आहे की, युक्रेनने रशियाच्या कोणत्याही नागरिकावर अत्याचार करण्यास प्रारंभ केल्यास तो युक्रेनचा शेवट होण्याचा आरंभ असेल.