अणूबॉम्बच्या सूक्ष्म किरणोत्सर्गांपासून वाचवणारे सूक्ष्म संहारक अग्निहोत्र !

तिसर्‍या महायुद्धात अणूबॉम्बच्या किरणोत्सर्गाने प्रदूषण होणार आहे. जगातील बहुतेक सर्वच राष्ट्रांकडे महासंहारक अशी अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे ती एकमेकांविरुद्ध डागली जातील. शत्रूराष्ट्रांकडून अणूबॉम्बचा मारा झाल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात संहार घडू शकतो. अणुबॉम्ब सूक्ष्म असल्याने या प्रभावी संहारकाचा किरणोत्सर्ग थोपवण्यासाठी सूक्ष्मातील काहीतरी करावे लागेल. त्यासाठी ऋषीमुनींनी यज्ञाचा प्रथमावतार असलेले ‘अग्निहोत्र’ हा उपाय सांगितला आहे. त्यामुळे वातावरण चैतन्यदायी बनते आणि संरक्षककवचही निर्माण होते. अग्निहोत्रामुळे वायुमंडलात सिद्ध होणारे दिव्य तेजोमंडल हे पारदर्शक काचेच्या तेजोगोलासारखे असते. अणुबॉम्बमधील अतिशय सूक्ष्म अशा संहारक किरणांनाही हे वायुमंडल भेदणे अशक्य होते. यामुळे संहारक घटकांपासूनही जिवाचे आणि त्या त्या वायूमंडलाचे रक्षण होऊ शकते.

अग्निहोत्र करण्याची कृती

रचना : हवन करतांना गायीच्या गोवर्‍या, गायीचे तूप आणि अखंड तांदूळ वापरले जातात. सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळी अग्निहोत्राचे हवन करावे. हवनपात्राच्या तळाशी गोवरीचा लहान आकाराचा एक चपटा तुकडा ठेवावा. त्याच्यावर गोवरीचे तुकडे तूप लावून गोवरीच्या उभ्या आणि आडव्या तुकड्यांचे २-३ थर अशा रीतीने ठेवावे. त्यामुळे आतील पोकळीत हवा खेळती राहील. नंतर गोवरीच्या एका तुकड्याला गायीचे तूप लावून पेटवावा आणि तो तुकडा हवनपात्रामध्ये ठेवावा. थोड्या वेळात गोवर्‍यांचे सर्व तुकडे पेट घेतील. अग्नि प्रज्वलित होण्यासाठी हवा घालण्यासाठी हातपंखा वापरू शकतो.

मंत्रपठण : अग्निहोत्राचे मंत्र त्यांच्या मूळ रूपात जसेच्या तसे कोणताही भेद न करता, स्थानात गुंजतील अशा नादमय रीतीने, फार गडबडीने किंवा फार सावकाश न करता, स्पष्ट आणि खणखणीत स्वरात उच्चारावे.

कृती : तांदळाचे दोन चिमूटभर दाणे तळहातावर अथवा तांब्याच्या ताटलीमधे घ्यावेत आणि त्यावर गायीच्या तुपाचे काही थेंब टाकावेत. अचूक सूर्योदयाच्या (किंवा सूर्यास्ताच्या) वेळी पहिला मंत्र म्हणावा आणि ‘स्वाहा’ शब्द म्हटल्यावर उजव्या हाताने मध्यमा, अनामिका आणि अंगठा यांच्या चिमटीत वरील तांदूळ-तूप मिश्रण घेऊन ते अग्नीत सोडावे. (बोटाच्या चिमटीत मावतील एवढे तांदूळ पुरेसे आहेत.) दुसरा मंत्र म्हणावा आणि ‘स्वाहा’ शब्द म्हटल्यावर उजव्या हाताने वरील तांदूळ-तूप मिश्रण अग्नीत सोडावे. मध्यमा आणि अनामिका यांना अंगठा जोडून, म्हणजेच आकाशरूपी निर्गुणाच्या बळावर अनुक्रमे तेज आणि आप या प्रवाहित लहरींच्या साहाय्याने हवनीय द्रव्याची पात्रात आहुती द्यावी.

परिणाम : तेजतत्त्वाच्या लहरींमुळे देवता जागृत होतात आणि आपतत्त्वाच्या साहाय्याने देवतांकडून येणार्‍या सात्त्विक लहरी भूमीमंडलाकडे प्रवाहित होतात.

सूर्योदयाच्या वेळी म्हणावयाचा मंत्र
सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम ।

प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम ॥

सूर्यास्ताच्या वेळी म्हणावयाचा मंत्र

अग्नेय स्वाहा, अग्नेय इदं न मम ।

प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम॥

अग्निहोत्र करतांना ‘सूर्य, अग्नि, प्रजापती यांच्या अंतर्यामी असणार्‍या परमात्मशक्तीला मी ही आहुती अर्पण करत आहे, ‘हे माझे नव्हे’, असा या मंत्राच्या अर्थाप्रमाणेच भाव हवा !

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक, आध्यात्मिक स्तरांवर करायच्या सिद्धता’)