‘हिंदुस्थानचे अध:पतन का झाले ? सामाजिक भ्रष्टतेने झाले ? वांशिक अध:पतनाने झाले ? नाही, नाही. आमची वेदनिष्ठा ढळल्याने झाले. ते परंपरा नष्ट झाल्याने झाले. आम्ही परंपरांची कास सोडली, परंपरा आता कुठे आहेत ? निधर्मीपणा (सेक्युलॅरिझम) या विकृत विचाराने आम्हाला ग्रासले. आम्ही धर्महीन दीन झालो. आमचा धर्म कोणता ? काय उत्तर द्याल ? माझी आई आणि वडील हिंदु होते म्हणतात; परंतु हिंदुत्वदर्शन, आचार, विचार निष्ठा, परंपरांचा कुठेही मागमूस दिसत नाही. हिंदु म्हणून घेण्यास लाज वाटावी, इतके आमचे अध:पतन झाले आहे. राजसत्तेने आणि समाजसत्तेने परंपरांचा विध्वंस करून हे अध:पतन घडवून आणले. याविरुद्ध आम्हाला सर्व बाजूंनी रान पेटवायचे आहे.’
(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०१९)