१. देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय धुवावेत.
२. देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा.
३. देवळाच्या पायर्या चढतांना पायरीला उजवा हात लावून नमस्कार करावा.
४. ‘देवतेला जागृत करत आहोत’, या भावाने घंटा अतिशय हळू वाजवावी.
५. देवतेची मूर्ती आणि तिच्यासमोर असलेली कासवाची प्रतिकृती (शिवाच्या देवळात नंदीची प्रतिकृती) यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा बसता, प्रतिकृतीच्या बाजूला उभे राहून हात जोडून विनम्रतेने दर्शन घ्यावे.
६. देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे.
७. देवतेला अर्पण करावयाची वस्तू (उदा. फुले) देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणांवर अर्पण करावी.
८. ‘देवतेच्या चरणी लीन होत आहोत’, या भावाने नमस्कार करावा.
९. दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात.
१०. निघण्यापूर्वी देवतेला नमस्कार करून ‘तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे’, अशी प्रार्थना करावी.
११. देवळातून बाहेर पडत असतांना देवतेकडे आपली पाठ एकदम होणार नाही, याची काळजी घ्यावी.
१२. देवळातून बाहेर पडल्यावर आवारातून परत एकदा कळसाला नमस्कार करावा व मग प्रस्थान करावे.
(सविस्तर शास्त्रीय माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘देवळात दर्शन कसे घ्यावे ?’)