कोरोना लसीमध्ये डुकराच्या मांसाचा वापर झाल्याच्या माहितीवरून इस्लामी देशांमध्ये चिंता

कोरोना लस उत्पादन करणार्‍या काही आस्थापनांनी डुकराच्या मांसाचा वापर केल्याचा दावा फेटाळला

नवी देहली – कोरोनाचे लसीकरण जगातील काही देशांमध्ये चालू झाले आहे. भारतातही लवकरच ते चालू होणार आहे; मात्र मुसलमान देशांनी चिंता व्यक्त केली आहे, ‘ही लस सडलेल्या पशूंची चामडी, हाड, गुरे आणि डुक्कर यांची चरबी उकळवून बनवली जात आहे. या लसीची वाहतूक आणि तिला थंड वातावरणात ठेवण्यासाठी डुकराच्या मासापासून बनलेल्या जिलेटीनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.’

इस्लाममध्ये डुकराला वर्ज्य मानले गेले आहे. लस बनवणारी आस्थापने फायझर, मॉडर्न आणि एस्ट्राजेनेका यांच्या प्रवक्त्यांनी मात्र लस बनवण्यासाठी डुकराच्या मांसाचा वापर करण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे ही लस बनवणार्‍या अन्य आस्थापनांनी अद्याप असे काहीच स्पष्ट केलेले नाही. काही चिनी आस्थापनांनी मात्र याविषयी कोणतेही विधान करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुसलमान देशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. काही इस्लामी देशांमध्ये कोराना लसीला ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची मागणी केली जात आहे.
या लसीवरून मुसलमान मौलवी काही यांनी असेही म्हटले आहे की, कोरोनाची लस देण्यास शरिरामध्ये ‘चिप’ बनवण्यात येत आहे. त्याद्वारे लोकांच्या मेंदूवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून तुम्ही तोच विचार करू शकता जो ज्यू यांना वाटत आहे.