(म्हणे) ‘गोव्यात वर्ष २०२२ मध्ये ‘सेक्युलर’ सरकार येणार !’ – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘सेक्युलरवाद’ म्हणजे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन !

प्रफुल्ल पटेल,

पणजी, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यात वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत ‘सेक्युलर’ सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पणजी येथील आझाद मैदानात झालेल्या एका सार्वजणिक सभेत बोलतांना केला. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातील आमदार चर्चिल आलेमाव यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा गोवा विभाग समविचारी पक्ष आणि व्यक्ती यांच्याशी  निवडणूकपूर्व युती करण्यास सिद्ध आहे, असेही प्रफुल्ल पटेल पुढे म्हणाले. प्रफुल्ल पटेल आणि आमदार चर्चिल आलेमाव यांनी त्यांच्या भाषणात रेल्वे दुपदरीकरण प्रश्‍नावर काँग्रेस पक्ष दुटप्पी धोरण अवलंबत असल्याचा आरोप केला.