प्रतिदिन १ अंडे खाल्ल्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो ! – संशोधकांचा  निष्कर्ष

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – प्रतिदिन १ अंडे खाल्ल्यामुळे मधुमेहाचा धोका वाढत आहे, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. शास्त्रज्ञांनी ८ सहस्र ५४५ चिनी युवकांवर केलेल्या संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. याआधीच्या संशोधनात प्रतिदिन अंडे खाल्ल्यामुळे मधुमेह होत नसल्याचा दावा करण्यात आला होता. आता नवीन संशोधनात याउलट दावा करण्यात आला आहे. जगभरात मधुमेहाच्या आजारावर ७६० अब्ज डॉलर खर्च करण्यात येतो.

नवीन संशोधनानुसार प्रतिदिन १ अंडे खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक होण्याचा धोका असतो. यामुळे अतिउच्च मधुमेह होण्याचाही धोका ६० टक्क्यांनी वाढतो.