पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे तुर्कस्तानमधील कट्टरतावादी संघटनेशी संबंध ! – स्वीडनमधील संशोधन संस्थेची माहिती

केंद्र सरकार जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी कधी घालणार ?

आयएचएच आणि पीएफआय दरम्यान बैठकीचे छायाचित्र (सौजन्य : Republic News)

नवी देहली – स्वीडनमधील संशोधन संस्था ‘नॉर्डिक मॉनिटर’ने तुर्कस्तानमधील कट्टरतावादी संघटना आय.एच्.एच्. (इंसानी यार्दिम वक्फी म्हणजेच मानवतावादी साहाय्य संघटना) आणि जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) यांच्यामध्ये संबंध असल्याचा दावा केला आहे.

या दोन्ही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी २० ऑक्टोबर २०१८ मध्ये एकमेकांची भेट घेतली होती. यात पी.एफ्.आय.चे नेते ई.एम्. अब्दुल रहमान आणि प्रा. पी कोया हे उपस्थित होते.

 (सौजन्य : Republic World)