१६.११.२०२० या दिवशी असलेल्या ‘भाऊबिजे’च्या निमित्ताने…
‘भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते. त्यानंतर भाऊ बहिणीला तिच्या नित्य उपयोगाच्या वस्तू, ग्रंथ अशी भेट देतो. प्रतिवर्षाप्रमाणेच यावर्षीही भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊ शकतो. त्या वेळी बहीण-भावाने त्यांची उपास्यदेवता किंवा गुरु यांना ‘पुढे येणार्या भीषण काळात आमचे रक्षण होऊ दे. या भीषण काळाचा सामना करण्यासाठी आमचे आत्मबळ आणि मनोबळ वाढू दे. आमच्या मुखात अखंड भगवंताचे नाम असू दे’, अशी प्रार्थना करावी.
अनेक द्रष्ट्या संतांनी सांगितल्यानुसार आगामी काळ अतिशय भीषण आहे. त्या काळात कोणताही भाऊ त्याच्या बहिणीचे किंवा कोणतीही बहीण तिच्या भावाचे रक्षण करू शकत नाही. या काळात केवळ भगवंतच आपले रक्षण करू शकतो. त्यामुळे भाऊबिजेच्या मंगलप्रसंगी भावा-बहिणींनी एकमेकांच्या रक्षणासाठी भगवंताला वरील प्रार्थनेद्वारे साकडे घालावे.’
– श्री. सिद्धेश करंदीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.११.२०२०)