पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून पाकिस्तानमधील हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा !

पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहार होत असतांना त्याविषयी निष्क्रीय रहाणार्‍या इम्रान खान यांना पुढे हिंदूच शिल्लक रहाणार नसल्याने अशा शुभेच्छा देण्यासाठी वेळ घालवावा लागणार नाही, हेही तितेकच सत्य आहे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील हिंदूंना पंतप्रधान इम्रान खान यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आमच्या सर्व हिंदु नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा’ असे ट्वीट करत इम्रान खान यांनी या शुभेच्छा दिल्या. पाकमधील हिंदूही कोरोनाच्या नियमांचे पालन करत घरात आणि मंदिरात जाऊन दिवाळी साजरी करत आहेत.

कराची येथील स्वामी नारायण मंदिरामध्ये दिवाळी साजरी करण्यात येत आहे. यासाठी मंदिरात रोषणाई करण्यात आली आहे, तसेच रात्रीच्या वेळी दिवे लावण्यात येत आहेत. कराचीसह लाहोर, मटियारी, तांडो अल्लाहयार, टांडो महंमद खान, जमशोरो बादिन, संघार, हाला, टांडा आदम आणि शहादपूर येथील हिंदूही दिवाळी साजरी करत आहेत. पाकमध्ये सुमारे ७५ लाख हिंदू रहातात.