विकास दुबे याला चौकामध्ये गोळ्या घालून ठार करा ! – ठार झालेल्या पोलिसाच्या वडिलांची मागणी

कानपूर (उत्तर प्रदेश) – विकास दुबे याच्या गोळीबारात ठार झालेल्यांपैकी मथुरा येथील पोलीस जितेंद्र यांचे वडील तीर्थ पाल यांनी आरोप केला आहे की, ‘दुबे याला अशा प्रकारे अटक करून पूर्णपणे वाचवण्यात आले आहे. त्याला चौकामध्ये आणून जनतेसमोर गोळ्या घालून ठार केले पाहिजे, तेव्हाच आमचे समाधान होईल. आताच्या अटकेने आम्ही समाधानी नाही.’