असा आहे आजच्या समाजवादाचा आचारधर्म !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘आजच्या समाजवादाची प्रेरणा, स्फूर्ती आहे स्वार्थ ! व्यक्तीचा स्वार्थ ! समाजाने व्यक्तीसाठी धडपडायचे. व्यक्तीच्या हक्काला जपायचे. व्यक्तीला पगार वाढवून द्यायचा. घरे द्यायची. कामाचे घंटे अल्प करायचे. शारीरिक सुखाकरता व्यक्तीने आटापिटा करायचा. आक्रोश करायचा. त्रागा करायचा. त्याकरता समाजाच्या अन्य घटकांची तमा बाळगायची नाही. अन्य उपेक्षित बहुसंख्य घटकांना आपल्या तोलाचे तरी मिळते का ? याची पर्वा (फिकीर), तर नाहीच. आपल्यामुळे ते होरपळले गेले, तरी हरकत नाही. शासनालाही ओरबाडायचे. शासनाला वाकवण्याकरता नाना उजवे आणि डावे उपाय योजायचे. संप, बंदी, जेल (कारागृह) भरो, अशी आंदोलने !

लूटालूट, जाळपोळ, हत्या अशी दुष्कर्मे. हवे ते युक्त-अयुक्त मार्ग चोखाळायचे. हाच आजच्या समाजवादाचा आचारधर्म. हीच आजच्या समाजवादाची आचारसंहिता.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (‘घनगर्जित’ मार्च २०१२)