‘वर्ष २०१९ मध्ये सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात एक याग करण्यात आला होता. यागाचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतली. याग चालू असतांना वाईट शक्तींमुळे वातावरणात पुष्कळ दाब निर्माण झाला होता. त्या वेळी यज्ञकुंडाच्या वरती सूक्ष्मातून वेगाने सुदर्शनचक्र फिरतांना दिसले. थोड्या वेळाने आगीतून ठिणग्या बाहेर पडतात, त्याप्रमाणे सुदर्शनचक्रातून ठिणग्या बाहेर पडतांना दिसल्या, या दोन्हीतील भेद पुढे दिला आहे.
१. फिरणारे सुदर्शनचक्र
गतीमान सुदर्शनचक्र फिरतांना दिसणे, हे भगवंताचे मारक कार्य चालू असण्याचे दर्शक आहे.
२. फिरणार्या सुदर्शनचक्रातून आगीप्रमाणे ठिणग्या बाहेर पडणे
सुदर्शनचक्रातून आगीप्रमाणे ठिणग्या बाहेर पडणे हे सुदर्शनचक्राची किमान, म्हणजे सर्वाधिक गती दर्शवते. सुदर्शनचक्राच्या प्रचंड गतीमुळे त्यातून आगीप्रमाणे ठिणग्या बाहेर पडतांना दिसतात. सुदर्शनचक्राच्या मारक कार्याचा हा अंतिम टप्पा मानला जातो.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.५.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.