केरळमध्ये चहा वेळेत न दिल्याने कोरोनाबाधिताकडून परिचारिकेला मारहाण

अशा कृतघ्न व्यक्तींना उपचारानंतर काही वर्षे कारावासात डांबण्याची शिक्षा केली पाहिजे !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – कोरोनाबाधितांना ठेवलेल्या विलगीकरण कक्षामध्ये (आयसोलेशन वॉर्डमध्ये) डॉक्टर आणि परिचारिका यांना रुग्णांकडून सहकार्य केले जात नसल्याचेही समोर येत आहे. केरळच्या कोल्लममध्ये एका रुग्णाने विलंबाने चहा मिळाल्याने एका परिचारिकेच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. आखाती देशातील मस्कत शहरातून परतलेल्या या कोरोनाबाधिताला ३ दिवसांपूर्वीच रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

१. केरळच्याच कोझिकोडमध्ये माजी खासदाराने कोरोनाचा संशय असणार्‍या त्यांच्या मुलाची चौकशी करण्यासाठी घरी आलेल्या रुग्णालयातील एका कर्मचार्‍याशी गैरवर्तन केले.

२. आखाती देशातून परतलेल्या एका २७ वर्षीय व्यक्तीने मलप्पुरममधील एका ‘आशा’ (आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिलेले सामाजिक कार्यकर्ते) महिला कार्यकर्त्यांच्या घरात घुसून तिला मारहाण केली. त्यानंतर त्या महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आले. त्या व्यक्तीला अटक करून वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.