अहिल्यानगर येथील श्री कानिफनाथ देवस्थानच्या ४० एकर भूमीची मुसलमानांकडून अनधिकृतपणे वक्फ बोर्डाकडे नोंदणी ! – श्री. ऋषिकेश बांगरे, सचिव, श्री कानिफनाथ ट्रस्ट

  • श्री कानिफनाथ ट्रस्टचे सचिव श्री. ऋषिकेश बांगरे यांची माहिती

  • वर्ष २००५ मध्ये अनधिकृत नोंदणीचा प्रकार !

  • राज्यशासनाकडे अहवाल पाठवूनही धर्मांधांवर कारवाई नाही !

पुणे, ९ डिसेंबर (वार्ता.) – अहिल्यानगर येथील गुहा तालुक्यातील कानिफनाथ देवस्थानची ४० एकर शेतभूमी मुसलमान समाजाने वर्ष २००५ मध्ये वक्फ बोर्डाकडे अनधिकृतपणे नोंदणी करून घेतली; मात्र याविषयी गावाला कोणत्याही प्रकारे माहिती देण्यात आलेली नाही. या आधारे ते अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. या अनुषंगानेच श्री कानिफनाथ मंदिरात १३ नोव्हेंबर या दिवशी घुसून मुसलमानांनी वारकर्‍यांना मारहाण केली आहे, असे वक्तव्य श्री कान्होबा तथा कानिफनाथ ट्रस्ट, गुहा मंदिराचे सचिव श्री. ऋषिकेश बांगरे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

१. श्री. ऋषिकेश बांगरे पुढे म्हणाले, ‘‘आमचे वारकरी भजन करत असतांना काही मुसलमान समाजकंटकांनी आमचे वारकरी बांधव आणि भगिनी यांना धक्काबुक्की करत वारकर्‍यांचा अमूल्य ठेवा असलेले टाळ-मृदंग यांची तोडफोड केली, तसेच हिंदु पुजारी आणि वारकरी यांना अमानुष मारहाण केली. आता तेथील देवस्थानात हिंदू भजन करू शकतात; पण धर्मांध हे हिंदूंच्या प्रत्येक कार्यक्रमात खोडा घालून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.’’

२. या संदर्भात अधिवक्ता प्रसाद कोळसे म्हणाले, ‘‘या भूमीविषयी ज्या अवैध नोंदी लावलेल्या आहेत, त्याचे पुनर्विलोकन करावे आणि ती ‘ऑर्डर रिकॉल’ करण्यात यावी, असा अर्ज आम्ही वक्फ बोर्डाकडे दिला आहे; पण अजूनपर्यंत वक्फ बोर्डाने याची कोणतीही नोंद घेतली नाही. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आम्ही तक्रार केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची महसूल खात्याच्या वतीने चौकशी करण्यात यावी; म्हणून अर्ज प्रविष्ट केला आहे. त्यानुसार त्यांनी त्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकार्‍यांची एक समिती नियुक्त केली आहे. त्याप्रमाणे समितीने अहवाल सिद्ध करून राज्यशासनाकडे पाठवला आहे; परंतु त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.’’

संपादकीय भूमिका 

  • धर्मांध मुसलमान आणि त्यांचा वक्फ बोर्ड कशा प्रकारे हिंदूंच्या मंदिरांची भूमी गिळंकृत करत आहे, याचे हे उदाहरण. या वक्फ बोर्डवर सरकारने कारवाई करण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक !
  • हिंदूंच्या मंदिराची भूमी हडप करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही, हे दुर्दैवी होय. सरकारने या प्रकरणाची त्वरित नोंद घेऊन हिंदूंना आश्‍वस्त करणे अपेक्षित आहे !