वारी : अध्‍यात्‍माचा प्रवास !

वारी वर्षातून एकदाच असते. त्‍यामुळे सततच ही आध्‍यात्मिक ऊर्जा मिळण्‍यासाठी, म्‍हणजे अध्‍यात्‍माचा हा प्रवास अखंड चालू ठेवण्‍यासाठी आणि आनंदी जीवन जगण्‍यासाठी तरुणांनी प्रतिदिन योग्‍य साधना करणे आवश्‍यक आहे.

विदेशी पाहुण्‍यांनी घेतला वारीचा आनंद !

जी-२० ‘डिजिटल अर्थव्‍यवस्‍था कार्यगट’ बैठकीसाठी पुण्‍यात दाखल झालेला आहे. या कार्यगटातील विदेशी पाहुणे पालखी सोहळ्‍याचा आनंद घेण्‍यासाठी सहभागी झाले होते.

आषाढी यात्रेसाठी २१ जूनपासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्‍यात येणार !

आषाढी एकादशीचा सोहळा २९ जून या दिवशी होणार आहे. त्‍यासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्‍ये २१ जूनपासून पाणी सोडण्‍यात येणार आहे, तर २९ जून या दिवशी बंद करण्‍यात येणार आहे

आषाढी यात्रेच्‍या निमित्ताने दर्शन रांगेत यंदा १२ छतांची उभारणी !

यंदाच्‍या वर्षी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीकडून दर्शनरांगेत एकूण १२ छते उभारण्‍यात येणार आहेत. या छतांमुळे एकाच वेळी अनुमाने १२ सहस्र भाविकांचे ऊन आणि पाऊस यांपासून संरक्षण होईल.

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पादुकांच्‍या स्नानाची सिद्धता पूर्ण !

पुण्‍यातून निघाल्‍यानंतर माऊलींच्‍या पादुकांच्‍या पहिल्‍या स्नानाची सिद्धता करण्‍यात आली आहे. सातारा जिल्‍ह्याच्‍या सीमेवरील निरा नदीच्‍या श्री दत्त घाटावर माऊलींच्‍या पादुकांना स्नान घालण्‍यात येते. यंदा १ या दिवशी स्नान होणार आहे.

वारकर्‍यांवर लाठीमार प्रकरणी कुणीही राजकारण करू नये ! – आळंदी देवस्‍थान

आनंदाच्‍या सोहळ्‍याला गालबोट लागले आहे. १२ जूनला घडलेल्‍या घटनेत आळंदी देवस्‍थानाचा संबंध नव्‍हता. हा प्रकार अपसमजातून झाला आहे. एकूण ४७ दिंड्या आहेत, त्‍यामधील ७५ वारकर्‍यांना ‘पास’ दिले होते. वारकरी शिक्षण संस्‍थेतील मुलांनाही देवस्‍थानचे पास दिले होते; मात्र अधिक संख्‍या असल्‍याने त्‍यांनी हट्ट केला. मुले वारकरी म्‍हणून हट्ट करत होती आणि कायदा सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी पोलीस काम करत होते.

लालमहालात (पुणे) सलग १२ घंटे वारकर्‍यांनी लुटला कीर्तनाचा भक्तीमय आनंद !

पंढरपूरचा पांडुरंग आणि वारकरी यांचे अतूट नाते आहे. वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला न जाता पांडुरंगाला भेटायला जातात. पंढरीचा पांडुरंग हा दर्शनाचा नाही, तर भेटायचा देव आहे.

पुणे येथे कुलुपबंद शाळेमुळे वारकर्‍यांच्या मुक्कामाचे हाल !

कुलुपबंद शाळेमुळे अनेक वारकर्‍यांना स्वत:ची पथारी (बिछाना) सकाळी वाहनतळाच्या जागेत टाकावी लागली. ती जागा अपुरी असल्याने त्यांना मग शाळेकडे येणार्‍या रस्त्यावरच पथारी टाकून बसावे लागले आहे.

वारकर्‍यांच्या बरोबरीने शहरातील विविध संस्था, संघटनांचे सदस्य सहभागी !

पुण्याहून सासवडकडे पालखीच्या समवेत चालतांना ऊर्जेचा अखंड प्रवाह जाणवतो. इतर वेळी एखादा कि.मी.ही चालण्यासाठी पाऊल न टाकणारे अनेक जण सहज ही वारी-वाट चालतात.

आळंदी येथील लाठीमार प्रकरणाची दुसरी बाजू समोर !

संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पालखी सोहळ्‍याच्‍या प्रस्‍थानापूर्वी वारकरी आणि पोलीस यांच्‍यामध्‍ये वाद झाला अन् पोलिसांनी वारकर्‍यांवर सौम्‍य लाठीमार केला. यानंतर याच प्रकरणाची दुसरी बाजू समोर आणणारा व्‍हिडिओ समोर आला आहे.