पहिले स्नान १८ जून या दिवशी होणार
निरा (पुणे) – पुण्यातून निघाल्यानंतर माऊलींच्या पादुकांच्या पहिल्या स्नानाची सिद्धता करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील निरा नदीच्या श्री दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येते. यंदा १ या दिवशी स्नान होणार आहे. स्नानाच्या कार्यक्रमाची सिद्धता केल्याचा आढावा आमदार मकरंद पाटील यांनी घेतला. तसेच या वेळी ‘वारकर्यांना नदीपात्रामध्ये स्नान करण्याची चोख व्यवस्था ठेवा, स्वच्छता ठेवा, वारकर्यांची रहाण्याची व्यवस्था करा’, अशा सूचनाही पाडेगाव ग्रामपंचायतीसह प्रशासनाला केल्या आहेत. या वेळी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या पादुकांना निरा स्नानासाठी सुरक्षा म्हणून १६ ते १९ जून या कालावधीत घाटावरील दशक्रिया विधी घाट बंद ठेवण्यात येणार असल्याचे सूचना फलकही ग्रामपंचायतीच्या वतीने लावण्यात आले आहेत.