आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा !

१० जुलै या दिवशी आषाढी एकादशी आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

आषाढी वारीच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा परिषदेकडून वारकर्‍यांना सुविधा देण्याचे नियोजन !

सोलापूर जिल्ह्यात संतांच्या पालख्या आल्यानंतर वारकर्‍यांना आरोग्यसुविधा देण्यासाठी दीड सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी कर्मचार्‍यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

पालखी सोहळ्यात समाजातील सर्वच घटकांनी योगदान देणे आवश्यक ! – अधिवक्ता विकास ढगे पाटील

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वाढत चालला असून प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणची जागा आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे वाढीव जागेची मागणी शासनाकडे केली आहे.

वारकर्‍यांना न्याय कधी ?

हिंदूबहुल देशात प्रत्येक वेळी अल्पसंख्यांक आणि त्यांच्या यात्रांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो आणि वारकरी मात्र उपेक्षित रहातात. भारतातील एकूणच व्यवस्था ‘सेक्युलर’ असल्यानेच असे होते. वारकर्‍यांसह हिंदूंच्या प्रत्येक यात्रेला न्याय मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

आषाढी यात्रेसाठी मिरज-पंढरपूर विशेष रेल्वेगाड्यांची सोय !

आजपासून एक्सप्रेस गाड्यांसाठी ‘जनरल तिकिटा’ची सोय उपलब्ध

लोणंद (जिल्हा सातारा) येथे मनोरंजनासाठी विनाअनुमती पाळणे आणि झोपाळे यांची उभारणी !

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद (जिल्हा सातारा) येथील गोटे माळाजवळ विनाअनुमती मनोरंजनासाठी विविध पाळण्यांची उभारणी केली जात आहे.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ‘मोबाईल ॲप’

आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना वारीविषयी माहिती मिळणे आणि अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे यांसाठी ‘आषाढी वारी २०२२’ या ‘मोबाईल ॲप’ची निर्मिती करण्यात आली आहे.

वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत ?

मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारकडे विचारणा

आषाढी वारीमध्ये वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घ्या ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना संसर्ग, आषाढी वारीतील सुविधा, पेरण्या, आपत्ती व्यवस्थापन यांविषयी आढावा बैठक