पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची रांग ५ ते ६ किलोमीटर अंतरापर्यंत जाते. आतापर्यंत भाविकांच्या सुरक्षेसाठी ४ छते उभारली जात होती; मात्र यंदाच्या वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दर्शनरांगेत एकूण १२ छते उभारण्यात येणार आहेत. या छतांमुळे एकाच वेळी अनुमाने १२ सहस्र भाविकांचे ऊन आणि पाऊस यांपासून संरक्षण होईल. यासमवेतच रांगेतच भाविकांना चहा, न्याहारी आणि भोजन देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.