आषाढी यात्रेसाठी २१ जूनपासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्‍यात येणार !

प्रतिकात्मक चित्र

सोलापूर – आषाढी एकादशीचा सोहळा २९ जून या दिवशी होणार आहे. त्‍यासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्‍ये २१ जूनपासून पाणी सोडण्‍यात येणार आहे, तर २९ जून या दिवशी बंद करण्‍यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली. सध्‍या उजनी धरणामध्‍ये ४८ टी.एम्.सी. पाणीसाठा शेष असून त्‍याची टक्‍केवारी वजा २७.४४ अशी आहे. सध्‍या धरणात पुरेसा पाणीसाठा नसला, तरी आषाढी वारीसाठी पाणी सोडण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. २१ जून या दिवशी धरणातून पाणी सोडल्‍यानंतर ४ दिवसांत हे पाणी पंढरपूर येथे पोचणार असून यात्रेनिमित्त येणार्‍या भाविकांची सोय होणार आहे.