मुंबई आणि नवी मुंबईत कृत्रिम तलावापेक्षा पारंपरिक विसर्जनाला भाविकांची पसंती !

२ सप्टेंबरला पहाटे ६ वाजेपर्यंत दीड दिवसाच्या ६० सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी !

मूर्ती विसर्जनाचे धर्मशास्त्र पाळण्यास प्रशासनाकडून भाविकांना होणारा प्रतिबंध, हा हिंदूंवरील अन्यायच आहे !

पश्चिम महाराष्ट्रात भावपूर्ण वातावरणात दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे  विसर्जन !

प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषण होते म्हणून आग्रही भूमिका घेणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी गप्प का रहाते ?

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी दीडशे फिरते हौद !

२ वर्षांपूर्वी फिरते हौद निर्मितीसाठी महापालिका प्रशासनाने कचरापेट्यांचा उपयोग केल्याचे उघडकीस आले होते. फिरत्या हौदांसारख्या अशास्त्रीय गोष्टींवर व्यय करण्यापेक्षा महापालिकेने भक्तांना वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जनास प्रोत्साहन दिल्यास श्री गणेशाची होणारी विटंबना रोखता येईल.

अन्य गणेश मंडळांना विसर्जनासाठी पुण्यातील लक्ष्मी रस्त्याचा वापर करण्यावर असलेली बंधने अवैध ! – बढाई समाज ट्रस्ट

विसर्जन मिरवणुकीच्या वेळी लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाची ५ गणेश मंडळे गेल्यानंतरच अन्य मंडळांनी मार्गस्थ व्हावे, हा रूढी-परंपरा आणि प्रथेचा भाग, म्हणजे कायदा नाही.

सार्वजनिक श्री गणेशोत्सवात हे टाळा !

• अविघटनशील ‘थर्माेकोल’चा वापर टाळा !
• जुगार, मद्यपान आदी अपप्रकार टाळा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रशासनास गणेशमूर्तीची विटंबना थांबवण्याविषयी निवेदने

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवण्याच्या माध्यमातून होणारी गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबवण्यात यावी अशा मागण्या करणारी निवेदने महानगरपालिका प्रशासन यांना देण्यात आली.

श्री गणेशमूर्ती विसर्जन परंपरेप्रमाणे चक्रेश्‍वर नैसर्गिक तलावातच करणार ! – वसई तालुक्यातील सोपारा गावातील ग्रामस्थांचा निर्धार

श्री गणेशमूर्तींचे विसर्जन परंपरेप्रमाणे सोपारा गावातील चक्रेश्‍वर नैसर्गिक तलावातच केले जाईल, याविषयी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागणीला वसई विरार शहर महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

‘पुनरावर्तन’ उपक्रमाच्या अंतर्गत मूर्तीदान करण्याचे पुणे महापालिकेचे धर्मद्रोही आवाहन !

वर्षभर नद्यांमध्ये होणार्‍या भयावह प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून केवळ गणेशोत्सवाच्या वेळी प्रदूषणाविषयी कृती करणारी पुणे महापालिका हिंदुद्रोहीच !

कृत्रिम हौदातील विसर्जित मूर्ती दुसर्‍या दिवशी वहात्या पाण्यात विसर्जित करू ! – रोहिणी शेंडगे, महापौर, नगर

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नगर येथील पाणी दूषित असल्यामुळे कृत्रिम हौदामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करून दुसर्‍या दिवशी त्या मूर्ती योग्य अशा ठिकाणी वहात्या पाण्यात विसर्जन करू, असे आश्वासन नगर येथील शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिले.