देहली येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनात सहभागी झालेल्या मुसलमान तरुणाची धर्मांध मुसलमानांकडून हत्या

हत्या झालेला मुसलमान तरुण अरमान (उजवीकडे)

देहली – येथील मंगोलपुरी भागामध्ये मुसलमान तरुण अरमान याची मुसलमानांनी चाकूद्वारे हत्या केली. अरमान यांच्या वडिलांनी आरोप केला, ‘अरमान हनुमान भक्त होता आणि त्याने श्री गणेशमूर्ती विसर्जनामध्ये सहभाग घेतल्याने त्याची हत्या करण्यात आली’, तर पोलीस या आक्रमणामागे पूर्ववैमनस्य असल्याचे सांगत आहेत. या वेळी अरमान यांच्या मोईन आणि फरदीन या दोघा भावांवरही आक्रमण करण्यात आले. तसेच अरमानचे मित्र विक्की आणि रवि यांच्यावरही आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी शाहरुख आणि त्याचे २ साथीदार सैफ अन् विनीत यांना अटक केली आहे.

१. अरमान याच्या कुटुंबियांनी सांगितले की, अरमान भगवान श्री हनुमानाचा भक्त होता. तो आखाड्यामध्ये जाऊन श्री हनुमानाची पूजा करत होता. त्याने श्री गणेशमूर्ती विसर्जनातही भाग घेतला होता. यामुळे अप्रसन्न झालेल्या शाहरुखने ‘अरमान याला विचारले होते की, तू गुलाल लावलेला आहे, तू कसला मुसलमान आहेस ?’ यानंतर त्याने त्याच्या साथीदारांच्या साहाय्याने त्यांची हत्या केली.

२. पोलिसांनी सांगितले की, दुपारी २.२५ वाजता घायाळ फरदीन दुचाकीवरून जात असतांना त्याच्या वाहनाने शाखरुखच्या दुचाकीला ठोकर दिली. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या वेळी अरमान याने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता शाहरुख आणि त्याचा मित्र शाहबीर याने त्याच्यावर चाकूद्वारे आक्रमण केले आणि ते पळून गेले.

संपादकीय भूमिका

  • धर्मांध मुसलमान हिंदूंवर तर आक्रमण करतातच; मात्र हिंदूंचे सण साजरे करणार्‍या स्वतःच्या धर्मबांधवांवरही आक्रमण करतात. याविषयी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?
  • नाशिक येथे अजान चालू झाल्यावर श्री गणेशमूर्ती विसर्जनातील वाद्ये थांबवण्यात आली होती. धर्मांध मात्र याउलट वागून हिंदूंचा शिरच्छेद करण्यास सिद्ध असतात, हे हिंदू लक्षात घेतील तो सुदिन !