श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मुठा नदीपात्रात पाणी न सोडण्याचा जलसंपदा विभागाचा निर्णय !

मुठा नदी

पुणे – प्रतीवर्षी श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन नदीत करण्यात येते; मात्र सध्या चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा झालेला असतांनाही गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी यंदा मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावर गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी पाण्याच्या विसर्गाचे नियोजन नाही, तसेच कालवा समितीची बैठक झालेली नसल्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • १० दिवस विधिवत् पूजा केलेल्या श्री गणेशाचे वहात्या पाण्यात विसर्जन करणे, हा श्री गणेशपूजनातील विधी आहे. असे असतांना जाणीवपूर्वक केवळ हिंदु धर्माला विरोध म्हणून आणि गणेशभक्तांचा अपमान म्हणून अशा कृती केल्या जातात का ?, असा प्रश्न भाविकांच्या मनात आल्यास चूक ते
  • काय ? याउलट नगरपालिकांकडून कोणतीही प्रक्रिया न करता कोट्यवधी लिटर अतीदूषित सांडपाणी अनेक नद्यांमध्ये सोडले जाते, त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही; मात्र किरकोळ कारणे सांगून गणेशभक्तांना शास्त्रानुसार आचरण करण्यास अटकाव केला जातो, हे दुर्दैवी आहे !