नवी देहली – अनंतचतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जन करतांना देशातील काही राज्यांत गणेशभक्तांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. उत्तरप्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांत विसर्जनाच्या वेळी १६ जणांचा मृत्यू झाला.
हरियाणा और उत्तर प्रदेश के अलग-अलग जिलों में शुक्रवार को गणेश विसर्जन के दौरान डूबने से 4 बच्चों समेत कम से कम 11 लोगों की मौत हो गई#GaneshVisarjan #UttarPradesh #Haryanahttps://t.co/9M5pxQNRWZ
— AajTak (@aajtak) September 10, 2022
हरियाणातील महेंद्रगड आणि सोनीपत येथे विसर्जनासाठी गेलेल्या ६ तरुणांचा बुडून मृत्यू झाला. याच घटनेच्या वेळी पाण्याच्या जोरदार प्रवाहात ९ जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. यांतील तिघांना वाचवण्यात आले. उत्तरप्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी ४ भावंडांसह ६ जणांचा बुडून मृत्यू झाला. महाराष्ट्रातील धुळ्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.