पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील विसर्जन हौदांमध्ये पाणी नसल्याने भाविकांकडून संताप व्यक्त !

प्रतीकात्मक छायाचित्र

खडकी (जिल्हा पुणे) – खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महादेव घाटावर (दत्त घाट) हौद बांधण्यात आले आहेत. घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी प्रशासनाच्या वतीने ६ फिरते हौद सिद्ध केले आहेत; मात्र महादेव घाटावर बांधण्यात आलेल्या हौदांमध्ये पाणीच नसल्याने अनेक गणेशभक्तांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने या हौदांत तातडीने पाण्याची सोय करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. यावर विसर्जन घाटाच्या हौदांमध्ये दहाव्या दिवशी पाणी सोडण्यात येणार असल्याचे आरोग्य अधीक्षक शिरीष पत्की यांनी सांगितले. (या सर्व उठाठेवी करून भाविकांचा रोष ओढवून घेण्याऐवजी प्रशासनाने भाविकांच्या भावनांचा आदर करून नी गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्याची व्यवस्था करावी ! – संपादक)

संपादकीय भूमिका

असा हलगर्जीपणा अन्य धर्मियांच्या विषयी प्रशासनाने केला असता का ? धर्मशास्त्रविरोधी  कृती करण्याचा अट्टहास करतांना तेही नीट न करणारे प्रशासन काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?