भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांची मागणी

मुंबई – भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतीकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करावे, अशी मागणी बोरिवलीचे भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी ६ मार्चला विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेतांना त्यांनी विविध सूत्रांकडे सरकारचे लक्ष वेधले. सावरकरांना अद्याप भारत सरकारने ‘भारतरत्न’ न दिल्याविषयी खेद व्यक्त केला. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त संघाचा राज्यशासनाने गौरव करावा, अशी उपाध्याय यांनी केली.