माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी आळंदीच्या (पुणे) नगराध्यक्षांसह २२ वारकरी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ !

प्रतिकात्मक छायाचित्र

आळंदी (पुणे), २ जुलै – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुका २ जुलै या दिवशी निमंत्रित वारकर्‍यांच्या उपस्थितीत प्रस्थान ठेवणार आहेत. या पार्श्वभूमीवर १ जुलैला निमंत्रित २०४ वारकर्‍यांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी घेण्यात आली. या चाचणीत सहभागी होणारे वारकरी, आळंदीच्या नगराध्यक्षा तसेच मंदिरातील कर्मचारी यांपैकी एकूण २२ जण ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. कोविड चाचणीनंतर संबंधित वारकर्‍यांना लगतच्या फ्रुटवाले धर्मशाळेत अलगीकरणात ठेवण्यात आले होते. कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असलेले वारकरी आळंदीत दाखल झाल्यानंतर अन्य ज्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी त्वरित आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.