श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील तत्कालीन मंदिर व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना १ वर्षानंतर अटक !
श्री तुळजाभवानीदेवीच्या खजिन्यातील अलंकार आणि प्राचीन नाणी गहाळ झाल्याचे प्रकरण
श्री तुळजाभवानीदेवीच्या खजिन्यातील अलंकार आणि प्राचीन नाणी गहाळ झाल्याचे प्रकरण
पूरग्रस्त किंवा आपत्काळात साहाय्य केल्याच्या अन्य पंथियांच्या बातम्या वाचायला मिळत नाहीत, हे लक्षात घ्या !
‘दार उघड बये आता दार उघड’, ‘आई राजा उदो उदो’, अशा घोषणा देत पुजारी आणि व्यापारी यांनी या आंदोलनाला प्रारंभ केला.
रोचकरी यांच्यावर मंकावती तीर्थकुंड स्वतःच्या नावावर करून हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे आणि पुरावे सिद्ध करणे, फसवणूक करणे यांसह अन्य कलमांसह गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद करत आहेत.
मंदिर बंद असल्याने अडचणीत असलेल्या पुजारी कुटुंबांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचे अनुदान देण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे श्री तुळजाभवानी मंदिर भक्तांसाठी बंद ठेवण्यात आले आहे, त्यामुळे मंदिरातील आवश्यक असलेली दुरुस्ती कामे चालू करण्यात यावीत, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष यांना देण्यात आले.
कोरोनाच्या संकटातून सर्वांचे रक्षण होण्यासाठी श्री तुळजाभवानीदेवीची धन्वन्तरी रूपात विशेष पूजा बांधण्यात आली. यात श्री तुळजाभवानीदेवीच्या नित्य पूजेनंतर मस्तकी मळवट भरून आधुनिक वैद्यांचे चिन्ह असणारा ‘लोगो’ हळदी-कुंकवात काढण्यात आला होता.
‘न मे भक्तः प्रणश्यति।’ असे भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे. साधना करून आपण भक्त बनलो, तरच त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. संकटामुळे निर्माण झालेली हतबलता आणि अस्वस्थता यांवर मात करण्यासाठी साधनाच करणे अपरिहार्य आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भक्त निवास येथील कोरोना केंद्रामध्ये २०० ऑक्सिजन बेड सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहेत. या सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे ऑक्सिजन बेड सेंटर जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. या आदेशानुसार श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात प्रतिदिन केवळ ५ सहस्र भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे.