
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. या आदेशानुसार श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात प्रतिदिन केवळ ५ सहस्र भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिरासह जिल्ह्यातील अन्य धार्मिक आणि प्रार्थनास्थळे प्रत्येक रविवारी बंद रहाणार आहेत, तसेच धार्मिक स्थळे भाविकांना दर्शनासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत म्हणजे १२ घंट्यांसाठी चालू रहातील. भाविकांनी ‘ऑनलाईन’ दर्शनाचा अधिक लाभ घ्यावा, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !