कल्याण येथील वीज चोरणार्‍या १३ बंगल्यांच्या मालकांवर कारवाई !

संबंधितांकडून वीजचोरीची रक्कम वसूल केल्यासच ते पुन्हा असे कृत्य करणार नाहीत !

किकली (जिल्हा सातारा) येथील श्री भैरवनाथ मंदिरात चोरी !

भुईंज येथील किकली गावातील श्री भैरवनाथ मंदिरात चोरी झाली आहे. अनुमाने १५ सहस्र रुपयांची पंचधातूची चांदीचा मुलामा दिलेली प्रभावळ चोरांनी उखडून नेली आहे. विशेष म्हणजे हे मंदिर पुरातत्व विभागाने संरक्षित केलेले आहे.

पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे सोलापूर बसस्थानकात चोरांचा सुळसुळाट !

पोलीस चौकीत पोलीस अनुपस्थित का असतात ? त्यांच्यावर वरिष्ठ कारवाई का करत नाहीत ? त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसेच आहे, असे लक्षात येते.

दिवाळीत पुणे येथे ८ दिवसांत १२ घरफोड्यांच्या घटना, अद्याप एकाही चोरास अटक नाही !

एकाही चोरास अटक न होणे, हे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. पोलिसांनी याकडे गांभीर्याने पहावे, असेच जनतेला वाटते ! 

समस्तीपूर (बिहार) येथे गावकर्‍यांकडून ३ चोरांना मारहाण : एकाचा मृत्यू

या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

‘विशेष अन्वेषण पथका’ची स्थापना – एक सोपस्कार ?

गेल्या काही वर्षांमध्ये कित्येक मंदिरांतील मूर्ती चोरीला गेल्याची प्रकरणे समोर आली आहेत; मात्र पोलिसांच्या मवाळ भूमिकेमुळे त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे यापुढे हिंदूंनीच मूर्ती चोरीच्या प्रकरणांमध्ये चोरट्यांना कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा करावा !

वनोजा (जिल्हा वाशिम) येथील संत गजानन महाराज मंदिरात चोरी !

जिल्ह्यातील वनोजा येथील संत गजानन महाराज मंदिरातील दानपेटीतून अज्ञात चोरट्याने ५० सहस्र रुपये पळवले. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली असून ती २३ ऑक्टोबरच्या रात्री १.१५ वाजता घडली.

अमेरिकेने ३३ कोटी रुपये किमतीच्या ३०७ प्राचीन मूर्ती भारताला परत केल्या !

एवढ्या मूर्तींची चोरी होईपर्यंत भारतातील पुरातत्व विभाग आणि सुरक्षायंत्रणा झोपल्या होत्या का ? भारताच्या प्राचीन मूर्तींच्या संवर्धनासाठी काहीही न करणारा पुरातत्व विभाग विसर्जित करा !

श्रीक्षेत्र जांब समर्थ येथील श्रीराम पंचायतन मूर्तीच्या चोरीचे अन्वेषण करण्यासाठी प्रशासनाला ४० दिवसांची समयमर्यादा !

दीड मास उलटूनही चोरीचे अन्वेषण पूर्ण का होत नाही ? इतके दिवस पोलीस प्रशासन काय करत आहे ? हिंदुत्वनिष्ठांना अशा मागणीचे निवेदन द्यावे लागणे पोलिसांसाठी लज्जास्पद !