चोरीचा माल सापडलेल्या १४ दुकानांवर कारवाई !

जिल्ह्यातील शेतीची अवजारे आणि विद्युत् जनित्रामधील सुटे भाग यांच्या चोरीची प्रकरणे वाढली. त्यामुळे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी भंगाराच्या १२४ दुकानांची पडताळणी केली. त्यात नांदगाव खंडेश्वर येथील फिरोज खान यांच्या भंगार दुकानात पोलीस तक्रारीप्रमाणे शेतीचा माल मिळाला.

वाहनांची चोरी करणार्‍याला नालासोपारा पोलिसांकडून अटक

दुचाकी आणि रिक्शा यांची चोरी करणार्‍या संजय यादव या आरोपीला नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी ७ गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या ४ दुचाकी आणि ३ रिक्शा हस्तगत करण्यात आल्या आहेत…

पेढी (जिल्हा यवतमाळ) येथे गोवंशियांच्या तस्करीचे प्रमाण वाढले !

तालुक्यातील पेढी हे गाव गोवंशियांच्या तस्करीचे केंद्र झाले आहे. येथून गायी आणि बैल यांना निर्दयीपणे कोंबून भाग्यनगर येथे कत्तलीसाठी त्यांची तस्करी केली जाते.

कल्याण, वसई आणि वाशी येथे एकाच दिवशी ४०३ वीजचोरांवर कारवाई !

वीजचोरांना कोणती कठोर शिक्षा देण्यात येणार आहे, हेही सांगितल्यास वीजचोरीला आळा बसेल !

कल्याण-डोंबिवलीतील वाढत्या चोर्‍या आणि घरफोड्या यांमुळे नागरिक त्रस्त !

कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही मासांपासून सोनसाखळी चोरी आणि घरफोडी यांचे प्रमाण वाढले आहे. दिवसाढवळ्या हे प्रकार होत आहेत. त्यामुळे ‘पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हेगारीवर वचक बसवावा’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरवर आता दिसणार ‘क्यूआर् कोड’ !

चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय : आतापर्यंत २० सहस्र गॅस सिलिंडर्सना ‘क्यूआर् कोड’ लावण्यात आला आहे. पुढील काही मासांत १४.२ किलो वजनाचे सर्व घरगुती गॅस सिलिंडर्स क्यूआर कोडशी जोडले जातील.

कलबुर्गी (कर्नाटक) येथे जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाच्या नेत्याची हत्या

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे माजी नेते मल्लिकार्जुन मुथ्याल यांची हत्या करण्यात आली. ते ६४ वर्षांचे होते. हत्येच्या एक दिवस आधी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई उपस्थित असलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार होते.

आगरा येथे मंदिरात चोरी करणार्‍या ३ मुसलमानांना अटक

येथील पुल छिंगा मोदी भागातील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात चोरी करणार्‍या रिझवान कुरेशी, शाहरुख आणि इम्रान यांना अटक करण्यात आली. रिझवान एका राजकीय पक्षाच्या अल्पसंख्यांक शाखेचा सदस्य असल्याचे सांगितले जात आहे.

नाशिक येथे शेतकर्‍याच्या घरातून दरोडेखोरांनी ७० तोळे सोन्यासह चारचाकी चोरली !

दरोड्याच्या घटना सतत घडत असतांना दरोडेखोरांना पकडण्यात अयशस्वी ठरलेल्या पोलीस अधिकार्‍यांना कायमचे घरी पाठवा !

मारेगाव (यवतमाळ) येथून अ‍ॅल्‍युमिनियमच्‍या २४ टन तारेची चोरी ! 

तालुक्‍यातील कानडा शेतशिवार चौकीतील २ चौकीदारांना ७ नोव्‍हेंबरच्‍या मध्‍यरात्री शस्‍त्राचा धाक दाखवून ८ ते १० जणांनी बांधून ठेवले आणि ३२ लाख रुपये किमतीची २४ टन अ‍ॅल्‍युमिनियमच्‍या तारेची चोरी केली.