कल्याण येथील वीज चोरणार्‍या १३ बंगल्यांच्या मालकांवर कारवाई !

७८ लाख ४९ सहस्र रुपयांची वीजचोरी उघड

कल्याण, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – महावितरणच्या कल्याण पूर्व १ उपविभागात वीज चोरांविरुद्धची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत पूर्व भागातील १३ बंगल्यांच्या मालकांनी वीजमीटरमध्ये फेरपालट करून चोरून वीज घेऊन विजेचा वापर केला आहे. १३ बंगल्यांच्या मालकांनी ७८ लाख ४९ सहस्र रुपयांची वीजचोरी केल्याचे महावितरणने सांगितले. (कायद्याचे भय वाटत नसल्याचाच हा परिणाम ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

संबंधितांकडून वीजचोरीची रक्कम वसूल केल्यासच ते पुन्हा असे कृत्य करणार नाहीत !