पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे सोलापूर बसस्थानकात चोरांचा सुळसुळाट !

सोलापूर बसस्थानक

सोलापूर – येथील बसस्थानकातून प्रतिदिन सहस्रोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. सध्या दिवाळीच्या सुट्यांमुळे बसस्थानकातील गर्दी वाढली आहे. वाढत्या गर्दीमुळे भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. अशा परिस्थितीत अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती करणे अपेक्षित असतांना प्रत्यक्षात बसस्थानकातील पोलीस चौकीत पोलीस अनुपस्थितीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे चोरीच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा प्रकरणांमध्ये अलीकडेच एका महिलेला अटक करण्यात आली आहे. सोलापूर बसस्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र या ठिकाणी पोलीस कर्मचारी अत्यल्प वेळा उपस्थित असतात.

संपादकीय भूमिका

  • चोरांचा सुळसुळाट होतो, याचा अर्थ पोलिसांचेच त्यांच्याशी लागेबांधे नसतील कशावरून ?
  • पोलीस चौकीत पोलीस अनुपस्थित का असतात ? त्यांच्यावर वरिष्ठ कारवाई का करत नाहीत ? त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसेच आहे, असे लक्षात येते.