समस्तीपूर (बिहार) येथे गावकर्‍यांकडून ३ चोरांना मारहाण : एकाचा मृत्यू

समस्तीपूर (बिहार) – येथील धमौन गावात ३ चोरांना गावकर्‍यांनी पकडून अमानुष मारहाण केली. त्यांना पाण्यात बुडवून मारहाण करण्यात आली. यात एकाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

या गावात २६ ऑक्टोबरच्या सायंकाळी ३ चोर एका संस्थेच्या संचालकांना  धमकावून पैसे उकळत होते. संचालकांनी आरडाओरडा केल्यानंतर चोर गोळीबार करत पळून गेले. गावकर्‍यांनी विटा आणि दगड मारत त्यांचा पाठलाग केला. चोर स्वतःला वाचवण्यासाठी पाण्याने भरलेल्या एका शेतात शिरले; पण जमावाने त्यांना पकडले. या ठिकाणी त्यांना पाण्यात बुडवून मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरांची सुटका केली. मारहाणीत घायाळ झाल्याने चोरांना रुग्णालयात भरती केले. त्यातील एकाचा दुसर्‍या दिवशी मृत्यू झाला. विकास कुमार असे त्याचे नाव होते. इतर दोघे पिंकेश आणि रवि यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.