पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन आणि कर आकारणी विभागाने जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया चालू केली आहे. लिलावासाठी काढलेल्या मालमत्तांची सूची वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केली आहे. टाळे ठोकलेल्या सर्व मालमत्तांचा लिलाव होणार आहे.
शहरात ६ लाख १५ सहस्र नोंदणीकृत मालमत्ता आहेत. त्यांपैकी १ सहस्र ४९१ मालमत्तांवर जप्तीचे अधिपत्र चिकटवले आहे. १८४ मालमत्तांना प्रत्यक्ष टाळे ठोकले आहेत, तर ५८४ मालमत्तांचे नळजोड खंडित केले आहेत. कराची थकबाकी असलेल्या ३२ सहस्र १४० जणांची जप्ती संदर्भातील अधिपत्रे काढली आहेत. शहरातील १ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांकडे ६८२ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. पैसे भरण्याची क्षमता असूनही जे मालमत्ताधारक कर भरत नाहीत, अशांवर लक्ष केंद्रित केले आहे, तर आर्थिक अडचणीत असलेल्या मालमत्ताधारकांना टप्प्याटप्प्याने कर भरण्याची मुभा दिली आहे, असे साहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाकर थकबाकीदार रहाणार नाहीत, यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक ! |