(म्हणे) ‘तालिबानने अफगाणिस्तानला आतंकवाद्यांचे आश्रयस्थान बनवू नये !’ – तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणार्‍या चीनची फुकाची चेतावणी

आतंकवाद्यांचा कारखाना असलेला पाकिस्तान चीनचा मित्र आहे. तालिबान्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असेही चीनने म्हटले होते. असे असतांना या चेतावणीला अर्थ काय ?आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनच्या अशा विधानांवर कदापि विश्‍वास ठेवू नये !

(म्हणे) ‘ तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणी लोकांना अमेरिकेपासून स्वातंत्र्य हवे होते ! –  समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क

भारतातील एकाही इस्लामी संघटनेने किंवा इस्लामी नेत्याने तालिबानचा विरोध केला नाही, हे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, सर्वधर्मसमभाव यांची टिमकी वाजवणारे लक्षात घेतील का ? कि त्यांचेही तालिबानला समर्थन आहे ?

(म्हणे) ‘तालिबानने आम्हाला शांतता आणि सुरक्षितता यांची हमी दिली !’ – शीख समुदाय

तालिबानसाठी शीख हे ‘काफीर’ आहेत. त्यामुळे त्याच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवणे हा आत्मघात होय !

तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणार ! – चीन

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो…

अफगाणिस्तान तालिबानचे ! पुढे काय ?

आता तालिबानची राजवट चालू झाल्यावर पाकच्या इशार्‍यावर आणि चीनची फूस मिळाल्यावर ते भारतावर आक्रमण करण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पाक आणि चीन यांचे समर्थन लाभलेला तालिबान भारताला धोकादायक, हे जाणा !

 ‘गुलामगिरीच्या जोखडातून अफगाणिस्तानची सुटका झाली आहे’, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले, तर चीनने तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार असल्याचे सांगितले आहे.

पहा Videos : तालिबान्यांच्या भीतीमुळे लक्षावधी लोक देश सोडून जाण्याच्या सिद्धतेत !

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यापासून तेथील स्थिती बिघडत चालली आहे. लक्षावधी लोक देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सहस्रो लोकांनी काबुल विमानतळावर धाव घेतली असून ते तेथील विमानांमध्ये बलपूर्वक घुसत आहेत.

तालिबान, पाक आणि चीन १ वर्षानंतर भारतावर आक्रमण करतील ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारत या आक्रमणासाठी सिद्ध आहे का ? हे आक्रमण होण्याची वाट पहाण्यापेक्षा भारताने आक्रमक होऊन पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करून ते कह्यात घ्यावे !

तालिबानसमोर अफगाणिस्तान सरकारची शरणागती !

तालिबानमधील दुसर्‍या क्रमांकाचा नेता मुल्ला बरादर हा राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासमवेत चर्चा करत आहे. या चर्चेनंतर अली अहमद जलाली याच्याकडे राष्ट्रपती गनी सत्ता सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे.

तालिबानी संकट !

अफगाणिस्तानचा दोन तृतीयांश भाग तालिबानी फौजांनी गिळंकृत केला होता. राजधानी काबूलला त्यांनी वेढा घातला आहे. त्यानंतर तालिबानमधील स्थिती अधिक बिकट होऊन चरमसीमेला पोचेल.