(म्हणे) ‘हिंदी मुसलमान तालिबानला सलाम करतो !’ –  मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

  • तालिबानला भारतातून जे कुणी समर्थन करत आहेत, त्या प्रत्येकावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात डांबले पाहिजे आणि त्यांच्या संघटनेवर बंदी घातली पाहिजे. असे न केल्यास या संघटना आणि त्यांचे धार्मिक नेते भारतात मदरशांतून ‘तालिबानी’ (‘तालिब’चा अर्थ ‘इस्लामी कट्टरतावादावर विश्‍वास ठेवणारे विद्यार्थी’, असा आहे. ‘तालिब’चे अनेकवचन ‘तालिबान.’) निर्माण करून भारतात इस्लामी राष्ट्र आणण्याचा प्रयत्न करतील, हा धोका लक्षात घ्याला हवा ! – संपादक
  • मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने भारतातील प्रत्येक मुसलमानाच्या वतीने तालिबानला ‘सलाम’ केला आहे, हे सर्व मुसलमानांना मान्य आहे का ? जर नसेल, तर ते उघडपणे विरोध का करत नाहीत ? मुसलमान बोर्डाच्या या वक्तव्याला विरोध करत नसतील, तर ‘या वक्तव्याला त्यांचे समर्थन आहे’, असेच हिंदूंनी लक्षात घ्यावे आणि भविष्यात येणार्‍या संकटासाठी सिद्ध व्हावे ! – संपादक
  • मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा सत्ताधारी भाजपच्या व्यतिरिक्त कुणीच जाहीररित्या विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या ! विरोध न करणारे राजकीय पक्ष आणि संघटना यांनी उद्या भारतात ‘तालिबानी राजवट’ येण्यासाठी धर्मांधांना साहाय्य केल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक
सज्जाद नोमानी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – पुन्हा एकदा हा दिनांक (१५ ऑगस्ट या दिवशी तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले) इतिहासात नोंदवला जाईल. एका दुर्लक्षित गटाने (तालिबानने) सर्वांत मोठ्या सैन्याला मात दिली. काबुलच्या महालात त्यांनी प्रवेश केला. काबुलमध्ये त्यांची उपस्थिती संपूर्ण जगाने पाहिली. त्यांच्यात ना कोणता अहंकार होता ना गर्व होता. त्या नवयुवकांनी काबुलच्या धरतीवर पाव ठेवला. त्यांचे अभिनंदन. तुमच्यापासून दूर असलेला हिंदी मुसलमान तुम्हाला सलाम करतो. तुमच्या धाडसाला सलाम करतो. तुमच्या कर्तृत्वाला सलाम करतो, अशा शब्दांत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे (मुसलमानांचे अखिल भारतीय कायदे मंडळाचे) प्रवक्ते मौलाना (इस्लामी अभ्यासक) सज्जाद नोमानी यांनी तालिबानचे समर्थन केले आहे.

यापूर्वी समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनीही तालिबानचे समर्थन करत त्यांना ‘भारतीय स्वातंत्र्यसैनिकांसारखे लढणारे’ म्हटले होते. यानंतर बर्क यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे; मात्र बर्क यांनी कोलांटउडी मारतांना त्यांनी केलेले विधान चुकीच्या पद्धतीने प्रसारित केल्याचा दावा केला आहे. ‘तालिबान दूर अफगाणिस्तानमध्ये आहे. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही’, अशा प्रकारचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. (बर्क यांनी केलेल्या विधानाचे चित्रीकरण उपलब्ध आहे. त्यात त्यांनी जी विधाने केली, तीच प्रसारमाध्यमांनी प्रसारित केली. आता कारवाईच्या भीतीने बर्क खोटाडेपणा करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर खोटे बोलण्यावरूनही गुन्हा नोंदवला पाहिजे ! समाजवादी पक्षानेही बर्क यांच्या तालिबानच्या समर्थनाविषयी स्वतःचे मत जनतेला सांगितले पाहिजे अन्यथा बर्क यांच्याप्रमाणे समाजवादी पक्षाचेही तालिबानला समर्थन आहे, असेच हिंदूंनी समजले पाहिजे ! – संपादक)