अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी तालिबानकडून चीनला आमंत्रण !

‘क्रौर्य’, ‘विश्‍वासघात’, ‘इतरांवर अन्याय करणे’ आदी समान ‘गुण’ असणारा तालिबान आणि चीन एकत्र आल्यास आश्‍चर्य ते काय ?

तालिबानच्या समर्थनार्थ ‘पोस्ट’ किंवा विधान करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करणार ! – मध्यप्रदेश शासन

मध्यप्रदेशमधील भाजप सरकारची हा अभिनंदनीय निर्णय आहे. वास्तविक असा आदेश केंद्र सरकारनेच देणे आवश्यक आहे आणि ज्यांनी आतापर्यंत अशा प्रकारचे समर्थन केले आहे, त्यांना तात्काळ अटक करून कारागृहातही टाकले पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

(म्हणे) ‘तालिबान्यांनी मर्यादेचे उल्लंघन केल्यावर कारवाई करू !’ – ट्विटर

तालिबान ही आतंकवादी संघटना असतांना तिच्या आतंकवाद्यांची खाती बंद करण्याऐवजी तिला लढा देणार्‍या सालेह यांचे खाते बंद करून ट्विटरने तिची मानवताविरोधी मानसिकता दाखवून दिली आहे. जगभरातील मानवतावाद्यांनी ट्विटरवरच आता बहिष्कार घालण्याची वेळ आली आहे !

तालिबानने भारताशी व्यापारी संबंध तोडले !

सुका मेवा महाग होण्याची शक्यता, जे तालिबानने प्रथम केले, ते भारताने करणे आवश्यक होते. भारताने तालिबानची सर्वच स्तरांवर कोंडी करून त्याला जन्माची अद्दल घडवणे आवश्यक !

तालिबानी ‘सलाम’ !

तालिबानने अफगाणिस्तान कह्यात घेतल्यानंतर भारतातील धर्मांधांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. कुणी त्यांचे कौतुक करत आहे, तर कुणी तालिबान्यांनी दाखवलेल्या ‘धारिष्ट्या’ला दाद देत आहे…

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात केवळ मुसलमान नाही, तर हिंदु तालिबानीही आहेत !’ – गीतकार मुन्नवर राणा

तालिबान्यांचे अशा प्रकारे समर्थन करणार्‍यांना आता तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात टाकण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत, असे राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !

अमेरिकेत असलेली अफगानिस्तानची संपत्ती अमेरिकेने गोठवली

तालिबानला १० अब्ज डॉलर्सला मुकावे लागणार !

अफगाणिस्तान सोडून पलायन करणार्‍या २० सहस्र निर्वासितांना ब्रिटन आश्रय देऊन त्यांचे पुनर्वसन करणार

सीरियामधून २० सहस्र निर्वासितांचे पुनर्वसन केलेल्या योजनेवर अफगाणिस्तानात निर्वासितांचे पुनर्वसनआधारित आहे.

(म्हणे) ‘तालिबानी आतंकवादाप्रमाणे हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा !’

आपण हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा, असे ट्वीट अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी केले आहे. त्या माध्यमातून त्यांनी तालिबानी आतंकवाद्यांची तुलना हिंदुत्वनिष्ठांशी केली आहे.

‘शेर-ए-पंजाब’ पुन्हा व्हावेत !

भारताचे इस्लामिस्तान करण्याचे स्वप्न अफगाणी, तुर्की आदी विविध आक्रमकांनी पाहिले; मात्र महाराजा रणजित सिंह यांच्यासारख्या अनेक थोर भारतीय योद्ध्यांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. धर्मांधांना हीच गोष्ट खुपते…