फेसबूककडून तालिबानवर बंदी

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘फेसबूक’ या सामाजिक माध्यमाने तालिबानवर बंदी घातली आहे. ‘अमेरिकेच्या कायद्यानुसार ‘तालिबान’ एक आतंकवादी संघटना आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या मंचावर या संघटनेला आणि या संघटनेशी संबंधित खात्यांवर बंदी घालत आहोत’, अशी माहिती फेसबूककडून देण्यात आली आहे. तसेच फेसबूकने अफगाणी भाषा समजण्यासाठी काही अफगाणी भाषा तज्ञांची नियुक्तीही केली आहे.